सोलापूर -जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत येथील समृद्धी स्पोर्ट्स क्लबने किशोर व किशोरी दोन्ही गटातून उपांत्य फेरी गाठली. वाफळे (ता. मोहोळ) येथील भीमशक्ती तरुण मंडळाने ही स्पर्धा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केली आहे. वाफळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते संघटक श्रीकांत ढेपे व आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू अश्विनी शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष अजितकुमार संगवे, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सचिव उमाकांत गायकवाड, वाफळे येथील प्रा. दादासाहेब पाटोळे, दादासाहेब मुसळे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शंकर दाढे, महादेव जवंजाळ, मुख्याध्यापक रामेश्वर चव्हाण, विश्वजीत देशमुख, गणेश नाईकनवरे, सेवानिवृत्त पीएसआय हनुमंत जवंजाळ, अशोक जवंजाळ, विठ्ठल जवंजाळ, विनोद नाईकनवरे, नानासाहेब चव्हाण, सागर जवंजाळ, अविनाश अंधारे, विजय जवंजाळ, शांतीलाल नाईकनवरे, राजाभाऊ जानराव, कवी कांबळे, कुमार जवंजाळ आदी उपस्थित होते.
उपस्थितांचे स्वागत भीमशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष अनिल माने, खजिनदार अण्णा नाईकनवरे, संयोजन समिती सदस्य श्रीकांत जवंजाळ यांनी केले. राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ यांनी सूत्रसंचालन केले.
—————
असे होणार उपांत्य सामने
किशोर : छत्रपती शाहू क्लब सोलापूर विरुद्ध दिन बंधू क्लब मंद्रूप, समृद्धी स्पोर्ट्स क्लब सोलापूर विरुद्ध शेवते.
किशोरी : जिल्हा परिषद शाळा वाफळे विरुद्ध छत्रपती शिवाजी प्रशाला वीट, समृद्धी स्पोर्ट्स क्लब सोलापूर विरुद्ध के.के. स्पोर्ट्स क्लब वाडीकुरोली.



























