पंढरपूर – अर्थ कारणाबरोबर समाजकारणात अग्रेसर असणारीपंढरपूर अर्बन बँक कर्मचारी वर्गाला रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांचे वतीने आज बँकेचेकर्मयोगी सभागृह येथे आरोग्य जनजागृती उपक्रमांतर्गत सीपीआर (Cardiopulmonary Resuscitation) या जीवनरक्षक तंत्रावरील देणेत आलेले मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी डॉ.नीरज दोडके व डॉ.वैभव सादिगले, तसेच बँकेचे संचालिका डॉ.संगीता पाटील यांनी हार्ट अटॅक सारख्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला त्वरित मदत कशी करावी याबाबत सखोल माहिती दिली.
यावेळी बँकेचे संचालक हरिश ताठे,अमित मांगले, गणेश शिंगण, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे, व्यवस्थापक गणेश हरिदास व कर्मचारीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बँकेचे कुटुंबप्रमुख प्रशांत परिचारक व चेअरमन सतीश मुळे यांनी रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांचे या स्तुत्य उपक्रमा बद्दल प्रशंसा केली.
कार्यक्रमा दरम्यान कृत्रिम श्वास (rescuebreathing) कसा द्यावा, तसेच हृदयावर किती प्रमाणात व कशा पद्धतीने दाब (chestcompressions) द्यावायाचे स्पष्ट मार्गदर्शन करण्यात आले. तसेच अपघात किंवा अचानक बेशुद्ध पडलेल्या रुग्णामध्ये सीपीआर आवश्यक आहे की नाही हे कसे ओळखावे,या बाबतही विविध उदाहरणांसह माहिती देण्यात आली.
डॉ.दोडके यांनी पीपीटीद्वारे एखाद्या व्याख्यात्या प्रमाणे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सीपीआर करण्याची योग्य पद्धत दाखवून उपस्थितांना प्रशिक्षण दिले, ज्यामुळे बँक कर्मचारी यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली.या उपक्रमामुळे बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्याबाबत मोठ्याप्रमाणात जागरूकता निर्माण झाली.
या बरोबरच संतुलित आहार, नियमित
व्यायाम आणि दैनंदिन चालण्याचेमहत्त्व यावरही त्यांनी विशेष मार्गदर्शन केले. निरोगी जीवनशैली अंगीकारणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमा निमित्त बँकेच्या संचालकांनी डॉक्टरांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच मुख्य कार्यकारीअधिकारी उमेश विरधे आणि कर्मचारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना डॉ. दोडके यांनी दिलेली सविस्तर उत्तरे सर्वांसाठी मार्गदर्शक ठरली.
बँकेचे कर्मचारी भविष्यात अर्थरक्षक
बरोबर जीवनरक्षक म्हणून कार्य करून अशी अपेक्षा रोटरीक्लब यांचे वतीने व्यक्त करणेत आली. याकार्यक्रमास बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























