महाराष्ट्र – वाढत्या उन्हाचा तडाखा एकीकडे सातत्याने वाढत असतानाच शहरातील राजवाडा परिसरातील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले फळे. फुले .भाजी मंडई मध्ये तहान भागवणाऱ्या आंबट लिंबांची दराची मात्र कमाल झाली आहे.
दहा रुपयाला एक छोटे तेही पिवळे नव्हे तर हिरवी लिंबू आणि वीस रुपयाला तीन लिंबे अशा दराने चढ्या भावाने ही लिंबे विक्री होत आहेत. या मंडईतील लिंबू विक्रेते नासिर बागवान यांनी विजापूर परिसरातून आलेली ही लिंबे नेहमीप्रमाणे पिवळ्या धमक रंगाची नसून हिरवी काहीशी रसाला कमी असणारी असल्यामुळे त्यातून येणारा लिंबाचा रसही कमी प्रमाणात असतो.
मात्र सरबतांसाठी सध्या लिंबांना मोठी मागणी असल्यामुळे ग्राहकांना कमी दरात ही लिंबे देण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. आणि विक्रीसाठी आणलेली ही लिंबे रसरशीत आणि ताजीर हवी त्यासाठी या लिंबांवर सातत्याने थंड पाण्याचा बाटलीतून कारंजा सारखा शिडकावा करावा लागत आहे.


























