सोलापूर : आमच्या राजेभाई उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्स, सोलापूर येथील फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या HSC परीक्षेचा विज्ञान विभागाचा निकाल 95.71% व कला विभागाचा निकाल 65.56% लागला.
विज्ञान विभागातून गुणानुक्रमे (1) कु.उजमा म.सलीम काझी 82.00% (2) कु. सिमीन इमरान नालवर 80.50% (3) कु.हबीबा खानम आकिल अहमद जामदार 70.33 % व कला विभागातून गुणानुक्रमे (1) कु. फायजा नौशाद सोफी 65.00% (2) कु. तहुरा उर्फ फिरदोस सादिक बानवान हंगरगेकर 61.33% (3) सौ. फरहीन म.रफिक सय्यद 56.33% गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष फैज अहमद इनामदार, उपाध्यक्षा तस्निमआरा शेख, प्राचार्या सबिहा पिरजादे यांनी अभिनंदन केले.



























