Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

किशोर-किशोरी खो-खोचा जल्लोष!ओम समर्थ, ओम साईश्वर, विद्यार्थी क्रीडा केंद्र व सरस्वती स्पोर्ट्स क्लबची विजयी सलामी

तरुण भारतbyतरुण भारत
May 3, 2026
in editor
0
किशोर-किशोरी खो-खोचा जल्लोष!ओम समर्थ, ओम साईश्वर, विद्यार्थी क्रीडा केंद्र व सरस्वती स्पोर्ट्स क्लबची विजयी सलामी
0
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिरच्या मैदानावर सुरू झालेल्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा २०२६-२७ ने पहिल्याच दिवशी थरार, वेग आणि उत्कंठेची पराकाष्ठा गाठली! महाराष्ट्र अॅमॅच्युअर स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित व मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेत दोन्ही गटात १०-१० संघ उतरले असून अजिंक्यपदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. स्पर्धेचे उद्घाटन उन्मेश नरवणे – अध्यक्ष – ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, दिलीप साठे – सेक्रेटरी ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, संजय पारेख – विश्वस्त – ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, भावेश पारिख – खजिनदार-ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर, प्रकाश नकाशे – सेक्रेटरी-महाराष्ट्र अम्युचर स्पोर्ट्स असोसिएशन, नितीन पाष्टे – प्रशिक्षक – ॐ समर्थ भारत व्यायाम मंदिर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी मुंबई खो-खो संघटनेचे प्र.कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा, खजिनदार डलेश देसाई, विकास पाटील यांच्यासह पदाधिकारी, खो-खो प्रेमी व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

किशोरी गट: ओम समर्थची एकतर्फी दणदणीत सलामी

या सामन्यात नाणेफेक ओम समर्थ भा. व्या. मंदिरने जिंकून संरक्षण स्वीकारले, आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत ओम समर्थने अमर हिंद मंडळाचा १८-७ (मध्यंतर १८-१) असा एक डाव राखून ११ गुणांनी धुव्वा उडवला. ओम समर्थकडून श्रेया तामणकर (नाबाद ४.३० मि. संरक्षण व ७ गुण), मैत्री नलावडे (२.३० मि. संरक्षण), स्वरा वांगडे (५ गुण), अनन्य राजे (२ गुण) यांनी सलग कामगिरी करत सामन्यावर वर्चस्व गाजवले. अमर हिंदकडून वृषाली मोरे (१.२० मि. संरक्षण व २ गुण), ईश्वरी शिंदे (२ गुण) यांनी प्रयत्न केले, मात्र ते अपुरे ठरले.

 

किशोर गट: ओम साईश्वरचा भक्कम विजय

या लढतीत नाणेफेक ओम साईश्वर सेवा मंडळने जिंकून आक्रमण निवडले, आणि ११-६ असा एक डाव राखून ५ गुणांनी विजय मिळवला. विजयी संघाकडून श्रातिक गामी (५ मि. संरक्षण २ गुण), आरव साटम (नाबाद २ मि. संरक्षण व २ गुण), अधिराज गुरव (२ मि. संरक्षण ४ गुण), चिन्मय तांबे (२ मि. संरक्षण) यांनी दमदार खेळ केला. पराभूत संघाकडून सार्थ वायंगणकर (२ मि. संरक्षण व १ गुण), कृषल वाघधरे (१.५० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी झुंजार लढत दिली.

 

रोमहर्षक सामना: ओम समर्थचा एक गुणाने विजय

या सामन्यात नाणेफेक वैभव स्पोर्ट्स क्लबने जिंकून संरक्षण निवडले, पण ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरने ४-३ (मध्यंतर १-२) असा एक गुणाने थरारक विजय मिळवला. निहाल शिंदे (२.३०, ४.४० मि. संरक्षण व १ गुण), रुद्र सिंग चव्हाण (नाबाद ३.५० मि. संरक्षण), ईशान देसाई (२.२० मि. संरक्षण) यांनी निर्णायक भूमिका बजावली. वैभवकडून शुभम माळी (५.१०, १.३० मि. संरक्षण व १ गुण), यश जाधव (३.३० मि. संरक्षण व २ गुण), अनिकेत गुप्ता (१.५०, १.५० मि. संरक्षण) यांनी जोरदार लढत दिली.

 

विद्यार्थी क्रीडा केंद्रचा नियंत्रित विजय

या सामन्यात नाणेफेक विद्यार्थी क्रीडा केंद्रने जिंकून संरक्षण स्वीकारले, आणि ६-४ असा साडेपाच मिनिटे राखून २ गुणांनी विजय मिळवला. विघ्नेश जाधव (२.३०, नाबाद ४ मि. संरक्षण व २ गुण), कार्तिक तोरस्कर (३ मि. संरक्षण), आर्यन परवाडी (२.५० मि. संरक्षण व १ गुण), अंशुमन भिडे (१.१० मि. संरक्षण व १ गुण) यांनी संघाला विजय मिळवून दिला. अमर हिंदकडून वेदांत हडशी (५.३०, नाबाद १.१० मि. संरक्षण), जीवन उपाध्याय (१.१० मि. संरक्षण व ३ गुण) यांनी चांगली झुंज दिली.

 

सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा दमदार शेवट

या सामन्यात नाणेफेक सरस्वती स्पोर्ट्स क्लबने जिंकून आक्रमण निवडले, आणि १६-१० असा ६ गुणांनी विजय मिळवला. विजयी संघाकडून यतीन, शिवम झा, अनिकेत सोनार, भाविक घाग यांनी प्रभावी खेळ केला, तर सरस्वती मंदिर हायस्कूलकडून अलीम, ऋषभ नाडकर यांनी चांगला प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी खेळाडूंच्या चपळतेने, जिद्दीने आणि थरारक खेळीने प्रेक्षकांची मने जिंकली असून पुढील सामन्यांमध्ये अजून अधिक रंगत वाढणार हे निश्चित!

 

Post Views: 137
Previous Post

पशू-पक्ष्यांसाठी ‘मायाचा ओलावा’: एकता महिला मंचचा स्तुत्य उपक्रम

Next Post

राजेभाई उर्दू हायस्कुलची उज्वल यशाची परंपरा कायम.

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
राजेभाई उर्दू हायस्कुलची उज्वल यशाची परंपरा कायम.

राजेभाई उर्दू हायस्कुलची उज्वल यशाची परंपरा कायम.

ताज्या बातम्या

चीन मध्ये कोळश्याच्या खाणीत स्फोट…९० कर्मचार्यांचा जागीच मृत्यू #viral #internationalnews

June 12, 2026
लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

June 12, 2026

शेअर बाजारातील १ कोटी ८१ लाखांच्या नुकसानीतून उद्ध्वस्त झाला हसता-खेळता संसार!

June 12, 2026

शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने तरुणास लोखंडी रॉड व लाथा बुक्याने मारहाण

June 12, 2026

शेतातील कचऱ्यापासून तयार नवीकरणीय डिझेलचा वाहनात यशस्वी प्रयोग

June 12, 2026

बुरलेवाडी येथील मजुराच्या मुलाची जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण झेप

June 12, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद

June 12, 2026

रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची माहिती संकलित होणार

June 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0906977

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697