बार्शी – उपळे दुमाला येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित वखारिया विद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनी शुक्रवारी ज्येष्ठ शिक्षक श्री. शंकर शिंदे आणि सेवक श्री. नागनाथ वाघ यांना निरोप देण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. दयानंद रेवडकर, प्रमुख पाहुणे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक काकासाहेब बुरगुटे, माजी मुख्याध्यापक रावसाहेब देशमुख, सतीशकुमार बुरगुटे, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ, पालक यांचे उपस्थितीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना संपूर्ण पोशाख, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना काकासाहेब बुरगुटे यांनी शंकर शिंदे आणि वाघ यांचे विषयी गौरव उदगार काढले. जिद्द,चिकाटी, कामावरील निष्ठा, स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा जपत कर्मवीर जगदाळे मामा यांचे वर अपार श्रद्धा ठेवून निष्ठेने ३८ वर्षे निष्कलंक सेवा केल्याचे सांगितले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर यांनी नागनाथ वाघ यांनी कामावर श्रद्धा ठेवून सेवा कार्य केले. आपले काम कमी दर्जाचे असे न समजता अंग मोडून काम केले
दररोज सकाळी उपस्थित राहणारे सेवक असल्याचे सांगितले. तर शंकर शिंदे हे अनेक गुण असलेले गुणवंत शिक्षक अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याचे सांगत, शिंदे सरांकडे पाहिल्यावर त्यांचे निवृत्तीचे वय झाल्याचे वाटत नाही. त्यांनी तरुणाला लाजवेल अशा प्रकारचेच शेवटपर्यंत आपल्याला दिलेले काम प्रमाणिकपणे केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा सहकार्याचा मला माझ्या प्रशासकीय कामात लाभ झाल्याचे नमूद केले. दोन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अभिष्टचिंतन करुन भविष्य काळात आरोग्य संपन्न ठेवण्याचे ईश्वराकडे प्रार्थना ही केली.
आपल्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यात श्री शंकर शिंदे सर आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी कु. समृद्धी ठोंगे या विद्यार्थिनीने, डॉ. कुणाल शिंदे, राहुल पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी सेवानिवृत्त शंकर शिंदे, सेवक नागनाथ वाघ मुख्याध्यापक दयानंद रेवडकर, प्रमुख पाहुणे काकासाहेब बुरगुटे, सतीशकुमार बुरगुटे यांचे हस्ते कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. डॉ. प्रशांत काशीद यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. आभार एन.एन. महाले यांनी मानले.
























