मंगळवेढा – दिनांक 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रामध्ये 11 डायलेसिस सेंटर व सात एमआरआय सेंटरचा शुभारंभ माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे केला. या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या शुभारंभास पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे उपस्थित होते. यानंतर ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे महाडायलिसिस सेंटरचे उद्घाटन मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सुनंदाताई आवताडे यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती दिपाली ताड, जिल्हा परिषद सदस्य व सार्वजनिक बांधकाम विभाग सभापती प्रदीप खांडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर डॉ.वर्षा डोईफोडे,वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुलोचना जानकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश साठे,डॉ.पूजा पवार, महाडायलिसिसचे स्टेट हेड जगन्नाथ हल्याळ उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांनी या मोफत डायलिसिस सेवेमुळे किडनी विकारग्रस्त रुग्णांना आर्थिक दिलासा मिळणार असून ही सेवा जवळच सुरू झाल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी वारंवार जाण्याच्या त्रासापासून सुटका होणार असल्याचे सांगून जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी याचा लाभ घेण्याचा तसेच गरजू रुग्णांपर्यंत या सेवेची माहिती पोहोचविण्याचे आवाहन केले. मा. जिल्हा शल्यचिकित्सक वर्षा डोईफोडे यांनी डायलिसिस विषयी माहिती दिली व ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.महाडायलिसिसचे स्टेट हेड जगन्नाथ हल्याळ यांनी या सेंटरसाठी पाण्याची उपलब्धता कमी असून पुरेसा पाणीसाठा उपलब्ध करून देण्याची विनंती नगराध्यक्षा सुनंदाताई आवताडे यांना केली.
ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे पाच अद्यावत डायलिसिस मशीन द्वारे मोफत डायलिसिस सेवा दिली जाणार असून एका दिवसात पंधरा रुग्ण या सेवेचा लाभ घेऊ शकतात.या केंद्रामध्ये प्रशिक्षित डायलिसिस तंत्रज्ञ, नर्सेस, सहाय्यक कर्मचारी असे मनुष्यबळ कार्यरत असून किडनी विकारतज्ञ डॉ.विनय आयरेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली उपचारांची गुणवत्ता सुनिश्चित केली जाते. तसेच स्वच्छता,सुरक्षितेचा तसेच वैद्यकीय मानकांचे काटेकोर पालन करण्यात येते.या सेवेमध्ये रुग्णांना रक्त तपासणी, महागडी इंजेक्शन,आहार तज्ज्ञांचा सल्ला इत्यादी सेवा निशुल्क मिळणार आहेत.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल जोशी,डॉ. प्रवीण माने डॉ. रेवता स्वामी, अधिपरिचारिका सुवर्णा सरताळे, वैशाली शिंदे,रूपाली कुलकर्णी,रेणुका मुंडे तसेच संतोष गवंडी,आबासो नागणे, अविनाश पट्टणशेट्टी, प्रल्हाद नाशिककर,अनिल यादव,सीमा मुलगे, सारिका कोळेकर, सुरेखाखरात, वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ राम लाड , डायलिसिस अधिपरिचारिका कालिंदी सावंत, बाबासाहेब शिवशरण,माने आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
























