पंढरपूर – संतांच्या भूमीत आणि विठ्ठलाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंढरपूर तालुक्यातील मौजे जैनवाडी येथील श्री दत्त मंदिरात ५ व्या अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे.”वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी” या उक्तीप्रमाणे ज्ञानेश्वरीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले आहे.
सोहळ्याचा प्रारंभ दि. ३० एप्रिल २०२६ रोजी तर सांगता ०७ मे २०२६ रोजी होणार आहे.हा सोहळा ह.भ.प.तात्या महाराज चौगुले भाळवणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरतीने दिवसाची सुरुवात होईल. सकाळी ७ ते ११ या वेळेत ह. भ. प. रामदास महाराज माने भाळवणीकर यांच्या व्यासपीठावरून ज्ञानेश्वरी पारायण होईल. दुपारी १२ ते १ वारकरी भोजन, २ ते ४ विश्रांतीनंतर सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ होईल. रात्री ७ ते ९ कीर्तन व १० ते ११ हरिनाम जागराने दिवसाची सांगता होईल.
सप्ताहात ०७ मे २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. शामसुंदर महाराज ढवळे यांचे काल्याचे कीर्तन होईल.सप्ताहात वीणापूजन, ग्रंथपूजन व प्रतिमापूजन ॲड. दिपक दामोदर पवार यांच्या हस्ते होणार आहे.
सप्ताहात दररोज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सेवा लाभणार आहे. ह.भ.प.रुपेश महाराज चौगुले, ह.भ.प. डॉ. किरण महाराज बोधले, वाणीभूषण ह.भ.प.अरुण महाराज यादव, ह.भ.प. हणमंत महाराज भोसले, ह.भ.प. जालिंदर महाराज चौगुले, ह.भ.प. लक्ष्मण महाराज कोकाटे, ह.भ.प. भाग्यवान महाराज रोडगे यांचे कीर्तन होणार आहे.
सप्ताहात दररोज दुपारचे वारकरी भोजन आयोजित केले आहे. तसेच सप्ताहात रात्रीचे भोजन काही ग्रामस्थांच्या वतीने दिले जाणार आहे.
समस्त ग्रामस्थ, सद्गुरू भजनी मंडळ व तरुण मंडळ, जैनवाडी यांनी पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या ज्ञानयज्ञामध्ये सहभागी होऊन नामवंत, गुणवंत, ज्ञानवरिष्ठ साधुसंतांच्या कीर्तन व प्रवचनाद्वारे ज्ञानामृताची वृष्टी अनुभवावी, असे आवाहन केले आहे.



























