अक्कलकोट – येथील श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कार्य हे सेवाभावी वृत्तीने व समर्पित कार्याने चालते, म्हणून भाविकांच्या सोई सुविधांना व भाविकांच्या सेवेला वटवृक्ष मंदिर समितीचे नेहमीच प्राधान्य असल्याचे मनोगत सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटूंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार बोलत होते. पुढे बोलताना इंद्रजित पवार यांनी स्वामी समर्थांच्या भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंदिर समिती अहोरात्र भाविकांच्या सेवेस तत्पर आहे. गर्दीचे स्वरूप पाहून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या मर्यादित परिसरातही वारंवार विविध प्रकारचे नियोजन असतात, त्यामुळे येणाऱ्या भाविकांचे नियोजनबद्ध स्वामी दर्शन हे सुलभतेने पार पडत आहे. अशी ही धन्य सेवा पाहून स्वामी सेवेप्रती असलेल्या मंदिर समितीच्या कार्याचं आपल्याला अभिमान असल्याचे मनोगतही इंद्रजित पवार यांनी व्यक्त केले.
यावेळी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, बाळासाहेब एकबोटे, शिवशरण अचलेर, अमर पाटील, खाजप्पा झंपले, विपूल जाधव, संतोष जमगे, श्रीकांत मलवे आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार व कुटूंबियांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.





















