सोलापूर – सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी सावलीसारखी साथ देणारे आणि प्रत्येक प्रसंगात एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आदर्श दांपत्य म्हणून ओळखले जाणारे, आदर्श माता, आदर्श पिता, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व सौ. उज्वलाताई शिंदे यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आज सोलापूरातील काँग्रेस भवन येथे उत्साहात कार्यक्रम पार पडला.
यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार व शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे दांपत्याला हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या सहजीवनासाठी आनंदी, निरोगी व प्रेरणादायी वाटचालीच्या सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी शहराध्यक्ष चेतन भाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, माजी महापौर सुशिलाताई अबुटे, माजी स्थायी समिती सभापती बाबा मिस्त्री, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, कार्याध्यक्ष हनुमंत सायबोळु, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, बाबुराव म्हेत्रे, वक्त असेल अध्यक्ष नागनाथ कदम, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपडंला, भटक्या विमुक्त अध्यक्ष युवराज जाधव, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक खन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, विश्वनाथ साबळे, बसवराज म्हेत्रे, सिद्धाराम चाकोते, सिद्राम सलवदे, सर एन. के. क्षीरसागर, अशोक कलशेट्टी, रुस्तुम कंपली, मोतीराम चव्हाण, अय्याज आळंद, भीमराव शिंदे, नूरअहमद नलवार, माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव, अॅड. करीमुनिसा बागवान, शुभांगी लिंगराज, मुमताज तांबोळी, संघमित्रा चौधरी, ज्योती गायकवाड, अनिता भालेराव, मीना गायकवाड, राजेश झंपले, कालिदास काळपगार, धीरज खंदारे, चंद्रकांत टिक्के, अॅड. श्रीशैल रणकंबे, राजकुमार राठोड, दत्ता नामकर, संजय कुराडे, आप्पा सलगर, गोपी खांडेकर, शुकूर शेख, मोहसीन फुलारी, दशरथ सामल, हणमंतु रुपनर, शिवाजी साळुंखे, अभिलाष अच्युगटला, दीपक मठ, जितराज गराड, जब्बार शेख, आयन नडीवाले, दत्तात्रय गजभार, हाजी मेहमूद शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


























