सोलापूर – अज्ञात वाहनाच्या धडकेत एक मोटर सायकल स्वार जागीच ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना बोरामणी नाका परिसरात जोशी गल्ली येथे आज मंगळवारी पहाटे सव्वातीन वाजता उघडकीस आली.
विनायक वसंतराव कुलकर्णी (वय 38 वर्ष , रा . सिद्धेश्वर नगर , मजरेवाडी सोलापूर ) असे त्या मयत दुचाकीस्वाराचे नाव तर रणजीत शंकर मळगे (रा. तांडूर, सध्या सात रस्ता, सोलापूर) असे जखमी चे नाव आहे . त्याला एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
यातील मयत हा सोलापुरातील एका रक्तपेढीत कामाला असून आज तो आपल्या जोडीदारासोबत मंगळवारी पहाटे मोटरसायकल ( क्र .एम एच 13 सी व्ही – 0246 ) वरून जोशी गल्ली कडून जात असताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली . यात तो गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यूमुखी पडला . ही खबर जोडभावी पेठ पोलिसांना समजली असता हवालदार सी .एम . रुपनर यांनी घटनास्थळी पोहोचून सदरचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात पहाटे साडेचार वाजता शवविच्छेदनासाठी दाखल केला .






















