पिलीव – माळशिरस तालुक्यातील बचेरी येथे सालाबादप्रमाणे श्री महालक्ष्मी देवी यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. यात्रेमध्ये पारंपारिक प्रथेप्रमाणे अनेक धार्मिक कार्यक्रम, कुस्ती मैदान व मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडले.
यात्रेनिमित्त महालक्ष्मी देवी यात्रा व कुस्ती कमिटीच्या वतीने जंगी कुस्त्याचे मैदान आयोजित करण्यात आले होते हे मैदान महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मल्ल सम्राट मा रावसाहेब आप्पा मगर यांचे मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत पार पडले. कुस्ती मैदानामध्ये शेवटची कुस्ती बेनापुर चे पैलवान नाथा पवार व काटीचे पैलवान गौतम शिंदे यांच्यामध्ये झाली. ती कुस्ती शेवटी बरोबरीत सुटली. कुस्ती मैदानात अनेक रंगतदार कुस्त्यांनी ग्रामस्थांची मने जिंकली. कुस्ती आखाड्याचे समालोचन ख्यातनाम समलोचक श्री पवार यांनी केले. कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब नगर निमगाव यांनी उपस्थिती लावली.
तसेच माळशिरस पंचायत समितीचे सभापती माननीय दत्ता मगर, पंचायत समितीचे सदस्य शिवराज पुकळे,मा पंचायत समिती सदस्य श्री शहाजी महाडिक शेट,पैलवान मोहन मदने, कुस्ती आखाडा नियोजन महालक्ष्मी देवी यात्रा व कुस्ती समिती तील सदस्य पैलवान रामभाऊ गोरड, पैलवान बंटु उर्फ संतोष गाढवे, प्रा सदाशिव शिंदे, श्री नारायण शिंदे, श्री अधिकराव माने श्री शांतीलाल शिंदे , श्री विकास सुळे, महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी गणेश देशमुख, तसेच यात्रा कमिटीचे सदस्य रवि पडळकर ,दत्तात्रय ढवळे ,दशरथ ढवळे, सुदाम शिंदे, रामभाऊ शिकारे ,धनाजी शिकारे ,बिराबाई शिंदे व ग्रामस्थांनी केले याप्रसंगी सर्व देणगीदार बंधूंचा फेटा बांधून सन्मान केला. तसेच त्यांच्या हस्ते कुस्त्या लावण्यात आल्या, कुस्ती मैदान पार पडण्यासाठी सर्व समितीने परिश्रम घेतले. कुस्ती मैदानाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
एक नंबरच्या कुस्ती चे मल्ल नाथा पवार,गौतम शिंदे, तसेच पै.रामभाऊ गोरड,पै.बंटु गाढवे,प्रा.सदाशिव शिंदे, शांतीलाल शिंदे, महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी गणेश देशमुख, वस्ताद माने,रवि पडळकर,हैबत शिंदे,बाबु गोरड,भारत पाटील आदी

























