सोलापूर : महानगरपालिका सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम या शाळेतील विद्यार्थी जयेश अंबादास म्हेत्रे (92 टक्के) , रिया संजय जाधव (80 टक्के) , जैद शेख (75 टक्के ) उत्तीर्ण होऊन यश प्राप्त केल्याने त्यांचा सत्कार सोलापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थी जयेश म्हेत्रे यांचे वडील अंबादास म्हेत्रे हे सोलापूर महानगरपालिका घंटागाडीवर ( कॉन्ट्रॅक्ट ) बिगारी म्हणून कार्यरत आहेत. जयेश याने 92 टक्के गुण मिळविले आहेत. याप्रसंगी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक मनीष बांगर, संतोष बुलबुले, मनपा सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम शाळेच्या मुख्याध्यापिका मोहसीना मुजावर, ॲड. कसबे, पालक संघाचे अध्यक्ष मुन्नीवर शेख आदी उपस्थित होते.


























