जालना – जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक तेघबीर
सिंग संधू यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात यथोचित सत्कार करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, जिल्हाप्रमुख महेश नळगे, जिल्हा संघटक भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम,हनुमान धांडे, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम घुगे, शहरप्रमुख दीपक
ननवरे,महेश पुरोहित, राजेंद्र जैस्वाल, अनिस पठाण,फैझान मिर्झा,बळीराम कोल्हे,देवजी जर्हाड,भक्त मात्रे,सुदाम काळे,शिवाजी कर्हाळे,अंकुश वाघ,अमजत मिर्झा,शिवाजी सोरमारे,सुभाष अरसूळ,इलिया कांबळे,दत्तू
नन्नावरे,राजेंद्र जर्हाड,सुभाष काटकर आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.
शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांच्याशी जालना शहरामधील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. शहरातील वाढती
गुन्हेगारी, बेशिस्त वाहतूक, अवैध धंदे, भाईगिरी, शाळा-महाविद्यालये व शिक्षण संस्था समोर उभे राहून तरुण मुलीं व विद्यार्थिनींना त्रास देणारे
रोडरोमिओं यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच सामान्य माणसाला न्याय मिळावा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा, या दृष्टीने सविस्तर चर्चा झाली. संधू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नक्कीच भयमुक्त आणि सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त केला.
जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक तेघबीर सिंग संधू यांचा शिवसेना
(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने यथोचित सत्कार
करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली.



























