पंढरपूर – येथील विवेक वर्धिनी विद्यालयातील सन २००३ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा अर्थात गेट-टुगेदरचा कार्यक्रम विवेक वर्धिनीच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य इमारतीमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी तब्बल २३ वर्षानंतर सर्व विद्यार्थीविद्यार्थिनी एकमेकांना भेटून खूप भारावून गेले होते.
सामाजिक,सांस्कृतिक, राजकीय, वैद्यकीय,विधीज्ञ आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना भेटून खूप आनंद व्यक्त करीत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्राचार्य डॉ. यु.आर.मुंढे हे होते. आपल्या भाषणात प्रशालेतील विविध सुविधांची व उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात विवेक वर्धिनीमध्ये झालेल्या उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा आणि बदललेले विवेक वर्धिनीचे रूप पाहून खूप आनंद व्यक्त केला व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आम्हीघडलो असे त्यांनी मत व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशालेस दीड टन क्षमतेचा ए.सी.भेट दिला.यावेळी माजी प्राचार्यराजेंद्र पाराध्ये, ज्येष्ठ शिक्षक संभाजी दत्तू ,किसन सरवदे , बाबुराव पावले , पापामियां इनामदार तसेच उपप्राचार्य एकनाथ शिंदे, पर्यवेक्षक मधुकर भोसले, नानासाहेब देवकते,,बाबासाहेब सिरसट ,संजय क्षीरसागर इत्यादी शिक्षक उपस्थित होते.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीगुरुराज देशपांडे, मोहन मलंग ,प्रवीण अचलारे, नितीन सातपुते, जमीर शेख, अनिकेत सामंत, प्रसाद देशमाने, किरण शिंदे, गीतांजली कदम, निलोफर बोहरी, रोहिणी पोरे, श्वेता मोहळकर, सारिका पवार,ज्योती माने, सोनाली माने, हेमा पवार ,वैभव साळुंखे, मालोजी शेंबडे, दीपक बनसोडे व त्यांचे मित्रमैत्रिणीनी परिश्रम घेतले. कार्यकाम खूप आनंदी वातावरणात संपन्न झाला.


























