सोलापूर – भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग केगाव. सोलापूर .येथे सॉफ्टवेंजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 व 20 मे 2026 रोजी सकाळी दहा वाजता फुल कॅम्पस इंटरव्यू ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. हा ड्राईव्ह 2025 व 2026 मध्ये पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
या भरती प्रक्रियेसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग व बाय मेडिकल इंजिनिअरिंग वगळता सर्व अभियांत्रिकी शाखातील विद्यार्थी तसेच बीसीए. एमसीए .आणि बीएससी कम्प्युटर ./आय टी शाखेतील विद्यार्थी पात्र राहणार आहेत. उमेदवारांना कोणत्याही बॅकलॉग किंवा इयर डाऊन नसणे आवश्यक असल्याचे महाविद्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर भरती प्रक्रियेपूर्वी 18 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने ओरिएंटेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये विद्यार्थ्यांना कंपनीची माहिती व निवड प्रक्रिया बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.( एक) एटीट्यूड टेस्ट (दोन )ग्रुप डिस्कशन. (तीन)एच आर. मुलाखत घेणार असून याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल देशमाने आपले मत व्यक्त करताना म्हणाले की विद्यार्थ्यांना दर्जेदार रोजगारच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. अशा फुल कॅम्पस ड्राईव्हमुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीमध्ये घडवण्याची उत्तम संधी मिळत असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विविध महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

























