कन्हेरगांव – संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातून नामस्मरण, हरिकथा आणि परमात्मभक्तीमुळे मिळणाऱ्या अंतःशांतीचे सुंदर वर्णन केले आहे. सतत देवाचे नामस्मरण आणि हरिकथा केल्याने मन शांत, प्रसन्न व समाधानी राहते. भगवंताच्या भक्तीतच खरे सुख आणि वैभव मिळते. भक्तीमुळे मनुष्य अहंकार, मोह आणि पाप-पुण्याच्या बंधनातून मुक्त होऊन परमात्म्याशी एकरूप होतो, असे प्रतिपादन हभप राजाभाऊ महाराज रोंगे पाटील यांनी केले.
कन्हेरगाव (ता. माढा) येथे बुधवारी (दि. १३ मे) सायंकाळी एकादशी निमित्त आयोजित कीर्तन सेवेत ते बोलत होते. गावातील सोमनाथ डोके व हनुमंत डोके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे ,हभप विष्णू महाराज डोके पाटील , सोसायटीचे संचालक दत्तात्रय डोके पाटील, विनायक पाटील, लिंबाजी हांडे , अमोल मोरे , गणेश शिंदे, केशव डोके, जयराम डोके ,लक्ष्मण पाटील, शहाजी पाटील, गहिनीनाथ ताटे , राजेंद्र डोके , जयंत डोके , बाबुराव डोके , पांडुरंग डोके, तुकाराम केदार, दिलीप शिंदे, बाळासाहेब डोके, दत्तात्रय साळुंखे, जालिंदर डोके, संतोष शिंदे, उत्तम भरगंडे, रामचंद्र खोचरे, शिवदास पाटील, बळीराम शिंदे, चेअरमन श्रीमंत पाटील, नागनाथ भगत, कांतीलाल शिंदे , महादेव पाटील, शंकर पाटील ,भिमराव धुमाळ, सौदागर भरगंडे, मोहन पाटील , दत्तात्रय पाटील ,समाधान पाटील, नागनाथ केदार , सोमनाथ भरगंडे , कबीर डोके, दत्तात्रय खोचरे, भारत डोके, तुकाराम मोरे उपस्थित होते.



























