बार्शी – सोलापूर जि.प.अध्यक्षपद प्रथमच बार्शी तालुक्यास मिळाल्याबद्दल व सदर विजयाचे शिल्पकार माजी आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांचा विशेष सत्कार सोहळा व बार्शी तालुक्यातील सर्व नूतन जि.प. सदस्य व पं.स. सदस्य यांचा भव्य सत्कार तालुका शिक्षक संघ, बार्शी तालुका शिक्षक संघ व सावित्रीबाई फुले प्रा.शिक्षक सह. पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वैराग येथे करण्यात आला.
मा. आ. राजेंद्र राऊत यांनी सांगितले की, हा विजय माझा नसून बार्शी तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांचा आहे. जनतेने जाती-पातीचे राजकारण नाकारुन विकासाच्या मुद्यांना प्राधान्य दिले आहे.
शिक्षक बब्रुवान काशीद यांनी सांगितले की, जमिनीवर राहून काम करणारा आणि मतदारसंघाच्या विकासासाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी म्हणून माजी आमदार राजेंद्र राऊत यांची ओळख आहे. राजेंद्र राऊत यांच्या अथक प्रयत्नांमुळे तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली विकासकामे मार्गी लागत आहेत. संघर्ष यात्री व विकासात्मक नेतृत्व अशी ओळख असलेल्या राजेंद्र राऊत
यांनी नेहमीच जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.
यावेळी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, पंचायत समिती सभापती मीनाक्षीताई रोंगे, उपसभापती संतोष निंबाळकर, बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा तेजस्वीनीताई कथले, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, बाजार समिती उपसभापती बाबा गायकवाड, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप गांधी, प्रशांत कथले, माजी जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, नगरसेवक विजय चव्हाण, दिपक राऊत, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सुरवसे, संजय भड, शरद बसवंत, रणजीत महानवर, विश्वनाथ साबळे, भिमा गव्हाणे, बाजार समितीचे माजी उपसभापती झुंबर जाधव, अमोल शिंदे, संचालक रामेश्वर पाटील, अभिजीत कापसे, विनायक डोईफोडे, बापू शेळके, शांताराम काशिद उपस्थित होते.
Post Views: 8