सांगोला – सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) येथे बुधवार दि.२० मे रोजी मेगा पूल कॅम्पसचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनिता इंगवले यांनी दिली. या पूल कॅम्पससाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध फार्मसी कॉलेजच्या डी व बी.फार्मसी अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या जवळपास ५३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या पूल कॅम्पस मध्ये नामांकित चार फार्मसी कंपनी सहभाग घेणार असून त्यामध्ये मार्कसन फार्मासुटिकल एलटीडी गोवा, एव्हरसुयर पोलीबॉन्ड इंडिया पीव्हीटी एलटीडी पुणे, दाटवायलर फार्मा पीव्हीटी एलटीडी पुणे, निपरो फार्मा पॅकेजिंग पीव्हीटी एलटीडी खंडाळा सातारा यांचा समावेश आहे, अशी माहिती संस्थेेचे विश्वस्त विश्वजीत इंगवले यांनी दिली. या पूल कॅम्पस मध्ये एप्टीट्यूड व टेक्निकल परीक्षेद्वारे निवडलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे अंतिम निवड करणार आहेत तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या पूल कॅम्पसमध्ये सहभाग घेऊन या संधीचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर प्रा.एस.एस.काळे व प्रा.एस.पी.जोकार यांनी केले आहे.
Post Views: 9