पंढरपूर – सध्या सूर्यनारायणाने कमालीचेरौद्ररुप धारण केले आहे. यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील उष्णतेचा पारा चक्क चाळीशीपार गेलेला दिसत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनरांगेतील भाविक उकाड्याने हैराण होतहोते. या उकाड्या पासून त्यांना थोडासा दिलासा देण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तुषार फवारणी अर्थात स्प्रिंकलर यंत्रणेचा अभिनव उपक्रम राबविलाआहे. मंदिर समितीच्या या उपक्रमामुळेदर्शन रांगेतील नागरिकांना गारवा जाणवत असल्याचे दिसून येत आहे. मंदिर समितीच्या या उपक्रमामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दर तीन वर्षातून एकदा येणारा अधिक महिना रविवार पासूनसुरु झालेला आहे. या अधिक महिन्या निमित्त विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात भाविकांची दररोज संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. भाविकांची संख्या वाढल्यामुळे विठुरायाची पदस्पर्शदर्शन रांग मारुतीच्या शेपटा प्रमाणे दररोज लांबच लांब (विस्तारित ) वाढत चाललेली दिसतआहे. या मध्येच सुर्यनारायण देखील कमालीचे तप्त झालेले आहेत. त्यामुळे सहाजिकच दर्शन रांगेत भाविकांना उन्हाचा प्रचंड त्रास जाणवत आहे.दर्शन रांगेतील भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता मंदिर समितीने घेतली आहे. मंदिर समितीकडून दर्शन रांगेतील भाविकांना थंड पिण्याच्या पाण्याची तसेच लिंबु सरबताची सोय केली जात आहे. या बरोबरच मंदिर समितीकडून दर्शन रांगेतील उड्डाणपूला जवळ भाविकांना थोडं हायस वाटवं यासाठी स्प्रिंकलर अर्थात तुषार फवारणी यंत्रणा देखील बसविण्यात आलेली आहे. या यंत्रणेमुळे दर्शन रांगेतील भाविकांना उन्हापासून थोडासा दिलासा मिळून थंड गारवा जाणवत आहे. मंदिर समितीच्या या उपक्रमामुळे भाविकांमधून समाधान देखील व्यक्त केले जात आहे.
Post Views: 10