
सोलापूर – मायक्रोग्रीन बाबत जनजागृती व्हावी, पोषण मूल्यांची माहिती मिळावी तसेच घरच्या घरी या मायक्रो ग्रीनची लागवड कशी करावी, या अनुषंगाने सोलापुरातील गार्डन लवर्स ग्रुपच्या वतीने रविवारी विजापूर रोडवरील इंचगिरी मठाच्या पाठीमागे असलेल्या अंजनी बहुउद्देशीय सभागृहात प्रदर्शन तसेच कार्यशाळा संपन्न झाली.
प्रारंभी गार्डन्स लवर्स ग्रुप च्या वतीने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी गार्डन लवर्स ग्रुपचे संयोजक राजेश शहा, वनविभागाच्या संध्याराणी बंडगर,येस न्यूज मराठी चे संपादक शिवाजी सुरवसे, डॉक्टर लोणीकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित सर्वांचा गार्डन लवर्स ग्रुप च्या वतीने सन्मान करण्यात आला.
या कार्यशाळेत प्राध्यापिका अंजली क्षीरसागर यांनी तयार केलेली मायक्रो ग्रीन्स आणि ते आपल्या शरीरासाठी किती उपयोगी आहेत याची उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्वांना अंजू क्षीरसागर यांनी तयार केलेले मायक्रो ग्रीन्स भेट म्हणून देण्यात आले.


















