
भोकरदन – राज्यातील सध्याच्या राजकीय वातावरणात
आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाचे राज्यसभेचे खासदार तथा सामनाचे मुख्य संपादक संजय राऊत यांच्या
समर्थनार्थ भोकरदन शहरात शिवसैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
महात्मा फुले चौक येथे आयोजित कार्यक्रमात राऊत यांच्या प्रतिमेला
दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी करण्यात आली.
यावेळी बोलताना शहरप्रमुख महेश पुरोहित यांनी संजय राऊत यांच्याविरोधात
सुरू असलेल्या घडामोडींना ‘राजकीय षडयंत्र’ असल्याचा आरोप केला.
शिवसेनेचा आवाज बुलंदपणे मांडणार्या नेत्याला बदनाम करण्यासाठी काही
भाडोत्री कार्यकर्त्यांचा वापर करत आहेत. मात्र शिवसैनिक कोणत्याही
दबावाला बळी पडणार नाहीत, असे ते म्हणाले. राज्यातील बदलत्या राजकीय
समीकरणांमध्ये संजय राऊत हे सातत्याने आक्रमक भूमिका घेत असल्याने ते
सत्ताधार्यांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये दिसून आली.
या कार्यक्रमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ग्रामीण
भागातही आपली संघटनात्मक ताकद कायम असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न
केल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पक्षनिष्ठा व्यक्त केली.
‘अफवा आणि सोशल मीडियावरील दिशाभूल करणार्या प्रचाराला बळी पडू नका,’
असे आवाहनही पदाधिकार्यांनी उपस्थितांना केले. यावेळी प्रदीप पैठणकर,
रवि सुरसे, संतोष सुरडकर, बालू जाधव, अशोक साबले, कृष्णा तराल, योगेश
पुंड, बबन शिंदे, आकाश सुरडकर, प्रल्हाद ओमकार, राजू शैलके, दत्तू
सुरडकर,नदन कचके, संजय आक्से, संदीप लाड, अन्ना सुरडकर यांच्यासह
शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००००००००
फोटो ओळी……
७-खासदार तथा सामनाचे मुख्य संपादक संजय राऊत यांच्या समर्थनार्थ भोकरदन
शहरात शिवसैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करुन राऊत यांच्या प्रतिमेला
दुग्धाभिषेक करून पुष्पवृष्टी करण्यात आली.




















