बार्शी – भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या बार्शी शहराध्यक्षपदी अमोल डिसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे . या नियुक्तीचे पत्र भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचे हस्ते व जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या युवा मेळाव्यात समारंभपूर्वक देण्यात आले. यावेळी भाजप शहाराध्यक्ष महावीर कदम, तालुकाध्यक्ष गडदे तसेच विविध पदाधिकारी नगरसेवक आदी उपस्थित होते.
अमोल डिसले हे प्रतिष्ठित शेतकरी कुटूंबातील उच्च शिक्षित तरुण कार्यकर्ते असून मागील पंधरा वीस वर्षांपासून माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे एकनिष्ठ सहकारी अशी त्यांची ओळख आहे. डिसले कुटूंबाला खूप राजकीय वारसा असून अमोल यांचे वडील सुधाकर डिसले हे एक कार्यक्षम सेवानिवृत्त एक्साईज इन्स्पेक्टर आहेत. शैक्षणिक पदवी नंतर अमोल यांनी बार्शीसारख्या ठिकाणी प्रथमच डिजीटल व्यवसायात जम बसवला होता. त्यानंतर रिअल इस्टेट & डेव्हलपर्स म्हणून लौकिक मिळवला आहे. अशा व्यवसायाबरोबरच त्यांनी समाज कार्यात ही स्वतःला नेहमी सक्रीय ठेवलेले आहे. त्यांच्या सुस्वभावामुळे त्यांना मोठया प्रमाणावर मित्र परिवार आहे. शिवाय त्यांना समाजकारण व राजकारणाची विशेष आवड आहे. त्यामुळे डिसले यांच्या नियुक्तीचा भाजपला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी नगराध्यक्ष रमेशआण्णा पाटील, विजयनाना राऊत, हळदुगेचे सरपंच मेजर जगताप, धामणगावचे सरपंच एस. के. पाटील, उपसरपंच महेश बोधले आदींनी अभिनंदन केले आहे.
Post Views: 16