
कुर्डूवाडी – 22 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, सोजरताई बहुउद्देशीय विकास मंडळ निमगाव टे. संचलित.कै. विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला अंबाड,या विद्यालयातील कु. श्रुती लालचंद सरवदे (216) तसेच कु. आरती सचिन टोणपे (168) यांनी,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश मिळवून, शिष्यवृत्तीसाठी पात्र झाल्या आहेत.

या विद्यार्थ्यांना ननवरे ए. एच. , तांबोळी एफ जे. आणि चव्हाण डी एल. यांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थीनी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. संजय मामा शिंदे तसेच संस्थेचे सचिव प्राचार्य रीजेश ठोंबरे. विद्यालयाचे प्राचार्य जवानसिंग रजपूत , माध्यमिक विभागाचे प्रमुख एम.एस. पाटील, उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख व्ही.एन. घाडगे ,यशवंत प्रायमरी स्कूल ,अंबाडचे प्राचार्य एस.आर. होनमोटे यांनी अभिनंदन केले .























