सोलापूर – अज्ञात कारणावरून सत्तुर व लाकडाने मारून एका वृद्ध शेतकऱ्याचा खुन करण्यात आल्याची घटना अक्कलकोट तालुक्यातील डोबरजवळगे येथे शनिवारी रात्री घडली.
बाबूसाब अलिसो जमादार (वय 62 वर्ष , रा. डोबरजवळगे) असे त्या मयत शेतकऱ्याचे नाव आहे .
मयत बाबूसाब जमादार हे शनिवार २३ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घराजवळ असताना त्यांना अज्ञात कारणावरून त्यांचे शेजारी मौलासा लालसा मकानदार, दाऊद मकानदार सह तिघांनी मिळून सत्तुर, लाकडाने हल्ला करून लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत बाबूसाब जमादार हे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. दरम्यान त्यांना उपचाराकरिता जखमी अवस्थेत येथील शासकीय रुग्णालयात पुतण्या शमशूर जमादार यांनी रात्री साडेदहा वाजता दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यानआज रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. याबाबत सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे.
Post Views: 6