Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ओबीसींच्या एकाही मंत्र्याने ओबीसींच्या अस्तित्वासाठी आवाज उठवला नाही

तरुण भारतbyतरुण भारत
May 25, 2026
in solapur
0
ओबीसींच्या एकाही मंत्र्याने ओबीसींच्या अस्तित्वासाठी आवाज उठवला नाही
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : ओबीसींच्या अन्नात माती कालवण्याचे काम होत असताना ओबीसींच्या हक्कांचे आणि हिताचे संरक्षण करण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये ओबीसींचे सहा मंत्री असताना एकाही मंत्र्याने ओबीसींच्या अस्तित्वासाठी आणि  हितासाठी आवाज उठवला नाही. देशभरात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आम्हाला मोजले जात नाही.त्यामुळे आमच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ओबीसी समाज एक झाला तर सरकारला त्याची खरी किंमत कळेल, अशी भूमिका
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत मांडली .
           रविवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हाके हे सोलापुरात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात 60 टक्के लोकसंख्या असताना ओबीसींना केवळ 0.6 टक्के निधी दिला जातो यापेक्षा दुर्दैव  कोणते ,असा सवाल करून मागासवर्गीय लोकांमध्ये जरांगे यांच्या सांगण्यावरून सामाजिक विषमता निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये ओबीसींचे सहा मंत्री असताना एकाही मंत्र्याने ओबीसींच्या अस्तित्वासाठी आणि  हितासाठी आवाज उठवला नाही. देशभरात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आम्हाला मोजले जात नाही.त्यामुळे आमच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखो कोटी रुपयांचे प्रोजेक्ट राबविले जातात. मात्र सामाजिक दुजाभाव कायम ठेवला जात आहे. महाज्योती सारख्या सामाजिक योजनेला निधी दिला जात नाही.आमच्या ज्वलंत आणि जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जात आहे.जरांगे यांच्यासारख्या   माणसाच्या  मात्र घरी जाऊन मंत्रिमंडळातील मंत्री आणि आमदारांकडून विचारणा केली जात असल्याचेही ते म्हणाले.
          आज दुर्बिणीतून शोधावेत इतकेही विरोधक शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे आम्ही सामाजिक न्याय मागायचे नाही का? असा सवाल करून
यासाठी आता राज्यात छोट्या छोट्या शंभर सभा घेऊन ओबीसींच्या हक्कासंदर्भात जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आज मराठा समाजाचे लोक ओबीसी म्हणून कशा पद्धतीने राजकीय आरक्षणाचा लाभ उठवित आहेत. याचीही अनेक उदाहरणे देऊन यातून ओबीसी समाजाचे आरक्षण उद्ध्वस्त केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.जर ओबीसी समाज एक झाला तर सरकारला त्याची खरी किंमत कळेल, असेही ते म्हणाले.
        लोकशाही आणि ओबीसींची चाड राहिलेली नाही. मनोज जरांगे यांच्या पाठीमागे त्यांच्या समाजातील ठेकेदार ,कारखानदार, राजकीय नेते रसद पुरवित असल्यामुळे ते या लढाईत जोमाने उतरतात. मात्र, आम्ही आमचे हक्क आणि अधिकार टिकले पाहिजेत , आम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी लढत राहू.मराठा समाजाकडे एक गुंठाही हे शिल्लक राहिलेला नाही असे जरांगे सांगतात. परंतु आमच्याकडे तर कसलाही गुंठा नव्हता आणि नाही . उघड्यावरती आमचे जीवन आहे.त्यामुळे आमच्या समाजाच्या व्यथा समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
        ओबीसी समाजाच्या जगन्नाथाचा रथ ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी सरकारला या समाजाची ताकद कळून चुकेल.भाजपने सेल्फ गोल करू नये अन्यथा ओबीसींची झेन-जी  त्सुनामी येईल. ओबीसींचे आरक्षण अबाधितपणे टिकले पाहिजे ही आमची भूमिका असून ओबीसी देशोधडीला लावण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करू नये, असेही ते म्हणाले.
Post Views: 11
Previous Post

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याची घेतली दखल

Next Post

आचारसंहितेच्या फटक्याने जि.प. वाहन खरेदी रखडली ?

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आचारसंहितेच्या फटक्याने जि.प. वाहन खरेदी रखडली ?

ताज्या बातम्या

कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

कै. प्रा. सुधाकर मानकर यांना श्रद्धांजली; प्राध्यापक, प्राचार्य संघटनांतर्फे ‘शोकसभा’ संपन्न

May 25, 2026
प्रा. डॉ. आडसूळ यांना राज्यस्तरीय “आदर्श शिक्षकभूषण” पुरस्कार प्रदान

प्रा. डॉ. आडसूळ यांना राज्यस्तरीय “आदर्श शिक्षकभूषण” पुरस्कार प्रदान

May 25, 2026
तिकीट तपासनीस यांच्यासाठी अग्निसुरक्षा कार्यशाळा आयोजित

तिकीट तपासनीस यांच्यासाठी अग्निसुरक्षा कार्यशाळा आयोजित

May 25, 2026
कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

May 25, 2026
दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरुवात

दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरुवात

May 25, 2026
अधिक महिन्यात ६ दिवसात सुमारे ३ लाख भाविकांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

अधिक महिन्यात ६ दिवसात सुमारे ३ लाख भाविकांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

May 25, 2026

भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; पुलाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक

May 25, 2026
दिवंगत फारुक सय्यद यांच्या साहित्यीक कार्यावर सोलापूर विद्यापीठात संशोधन व पीएच.डी पदवी प्रदान

दिवंगत फारुक सय्यद यांच्या साहित्यीक कार्यावर सोलापूर विद्यापीठात संशोधन व पीएच.डी पदवी प्रदान

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0878216

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697