
सोलापूर : श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ आणि महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्यात घेण्यात येणारे रक्तदान शिबिरास रविवार दि.24 मे रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“रक्तदान हेच जीवनदान” या संदेशाला साकार रूप देत या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले ज्यामुळे शहरात असलेल्या रक्त तुटवटाला लाभ झाला. या शिबिरात समाजातील युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिबिरामध्ये एकूण ५० बाटल्या रक्त संकलित करण्यात आले असून, हे रक्त शहरातील ब्लड बँकेमार्फत थॅलेसेमिया ग्रस्त मुले, अपघातग्रस्त रुग्ण व इतर गरजू रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी ठरणार आहे. रक्तदानानंतर सर्व दात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष श्री. मणिकांत दंड, सचिव श्री. जयेश पटेल, श्री. चिमनभाई पटेल, श्री. कांतीभाई पटेल, श्री. राजेश देढिया, श्री. खुशाल देढिया, श्री. निलेश पटेल, श्री. अतुल पटेल, श्री. अमित पटेल, श्री. मितेश पंचमिया, श्री. धर्मेश राडिया, स्वातीबेन देसाई, कविता पटेल, अरुणाबेन शहा, हसुमतीबेन पटेल, चंद्रेश माधू, संप्रित पटेल, कौशल रांभिया यांचा समावेश होता. शेवटी इंडियन रेड क्रॉस सोसायटी दमानी ब्लड बँक तर्फे मंडळाचे आभार मानण्यात आले
























