सोलापूर : कॉलेजला ए-जा करणाऱ्या एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून प्रेमसंबंधासाठी धमकी दिल्याप्रकरणी एका तरूणाविरूद्ध जेलरोड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७८, ३५१(२) तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे .
आकिब आजमोद्दिन शेख (रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पीडित मुलगी ही ३० एप्रिल रोजी दुपारी कॉलेजमधून घरी जात होती. तेव्हां आकिब शेख याने तिचा रस्ता अडवून प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. मुलीने नकार दिल्यास तिचे फोटो व्हायरल करून बदनामी करण्याची तसेच तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर १५ मे रोजी दुपारी व्हिवको प्रोसेस चौक परिसरात आरोपीने पुन्हा मुलीचा पाठलाग करत तिला त्रास दिला. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सर्व घटना आपल्या पालकांना सांगितली. मुलीच्या आई वडीलांनी जेलरोड पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपी विरुद्ध रीतसर फिर्याद दाखल केली आहे . पुढील तपास सुरू आहे .
Post Views: 17