मंगळवेढा – भाळवणी येथे आंब्याच्या झाडाचे आंबे दिल्याच्या कारणावरुन एका 33 वर्षीय तरुणास डोकीत दगड घालून गंभीर जखमी केल्या प्रकरणी पद्मिनी गायकवाड,सुनिता पाटील,वेदांत पाटील,आदित्य पाटील (रा.आलेगाव) यांच्या विरुध्द पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील जखमी फिर्यादी रविकिरण गायकवाड (रा.भाळवणी) हे दि.7 मे रोजी दुपारी 3 वाजता घराच्या पाठीमागे असलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे पत्नी वैशाली व फिर्यादी उतरवत असताना फिर्यादीची आई पद्मिनी,बहिण सुनिता हिची मुले आदित्य व वेदांत हे सदर ठिकाणी आले व सजाबाई गायकवाड हिला तुम्ही आंब्याच्या झाडाचे आंबे का दिले? असे म्हणून वरील आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत पडलेला दगड घेवून फिर्यादीच्या डोकीत मारुन गंभीर जखमी केले. या दरम्यान फिर्यादीची पत्नी वैशाली ही भांडणे सोडविण्याकरिता मध्ये आली असता तिलाही शिवीगाळी करीत तिलाही लाथाबुक्क्याने मारहाण केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Post Views: 11