मंगळवेढा – ब्रम्हपुरी येथील रीलस्टार याच्या 25 वर्षीय पत्नीने एका हॉटेल मध्ये पत्र्याच्या लोखंडी अँंगलला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या घटनेची अकस्मात मयत म्हणून मंंगळवेढा पोलीसात नोंद झाली आहे. दरम्यान नव विवाहित पत्नीने आत्महत्या का केली? या चर्चेला ब्रम्हपुरी परिसरात उलट-सुलट उधाण आले आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील खबर देणारे निलेश विलास पाराध्ये (वय 30 वषेर्र्) हे हॉटेल व्यवसायिक असून मयत तथा त्यांची पत्नी रोहिणी निलेश पाराध्ये हिने दि.26 मे रोजी दुपारी 2.30 वाजता अज्ञात कारणावरुन हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाक घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिलेल्या खबर मध्ये म्हटले आहे. दरम्यान हे पती-पत्नी रीलस्टार म्हणून ओळखले जात असून ते आपल्या व्यवसायानिमित्त सोशल मिडीयावर सातत्याने रील बनवून टाकत असल्यामुळे सुप्रसिध्द झाले होते. मागील पाच ते सहा वर्षापुर्वीच त्यांनी विवाह केला होता. तद्नंतर ते पुणे येथे काही वर्षे स्थायिक होवून मागील वर्षी ब्रम्हपुरी हद्दीत येवून त्यांनी सोलापूर-मंगळवेढा या राष्ट्रीय महामार्गावर एका शेतात रोडच्या कडेला हॉटेल ग्रामपंचायत नावाने व्यवसाय सुरु केला होता. तद्नंतर त्यांनी बालाजीनगर येथेही हॉटेल व्यवसाय चालू केला. दि.26 मे रोजी 2.30 वाजता भरदुपारी हॉटेल मध्ये कोणी नसताना अचानक रोहिणीने गळफास घेवून जीवनाचा शेवट केला. या मागे नेमके कोणते कारण आहे? याचा पोलीस हवालदार मनोज खंडागळे हे कसून शोध घेत आहेत.
Post Views: 23