जेऊर – जेऊरवाडी तालुका करमाळा येथे भरतीपूर्व प्रशिक्षण घेत असलेल्या योद्धा अकॅडमीच्या पोलीस भरतीमध्ये एकाच वेळी भरती झालेल्या 38 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
शासनाच्या गृह विभागाच्या वतीने यावर्षी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पोलीस भरतीचे आयोजन करण्यात आले होते या भरतीमध्ये जेऊरवाडी तालुका करमाळा येथील युद्ध करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सहभाग घेतला होता यामधील विविध ठिकाणी 38 विद्यार्थी भरती झाले आहेत या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य अभिमन्यू माने जेष्ठ कीर्तनकार विठ्ठल पाटील महाराज यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील होते यावेळी इंग्लिश टीचर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण लावंड आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे सुभेदार मेजर विलास नाईकनवरे यांची भाषणे झाली. सुरुवातीला नवनाथ नाईकनवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा व पालकांचा सन्मान करण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार वैभव नाईकनवरे यांनी मांडले या कार्यक्रमाला करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध रीलस्टार प्रशांत तकीक जिजामाता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष हंबीरराव नाईकनवरे यशकल्याणी नेचर कन्सर्वेशनचे कल्याणराव साळुंके मुंबई महापौर केसरी पैलवान विजय गुटाळ गुरुकुल एज्युकेशन संस्थेचे नितीन भोगे विलास लबडे यांच्यासह अकॅडमी चे सर्व शिक्षक पालक व परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.