टेंभुर्णी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, माढा तालुका यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वा जयंती उत्सव, मूर्ती वाटप कार्यक्रम तसेच नव-निर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक किशोर बापू सलगर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात धनगर समाजाच्या राजकीय सहभागावर भाष्य केले. धनगर समाज हा शब्द पाळणारा समाज असून समाजातील तरुणांनाही आता राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. दीड कोटी लोकसंख्या असलेला हा समाज सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी खासदार वडकुते यांनी आयोजक किशोर सलगर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत, अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच होत असून तो समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. आगामी काळात किशोर सलगर यांना निश्चितच राजकीय बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच रामभाऊ टकले यांच्या सहकार्याचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सदर उपक्रमाचे कौतुक केले. शिंदे कुटुंबीय आणि भारतीय जनता पक्ष हा कायमच धनगर समाजासह सर्व मायक्रो ओबीसी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिथे जिथे संधी उपलब्ध होईल, त्या ठिकाणी समाजातील होतकरू व तरुण नेतृत्वाला संधी दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती शिवाजीराजे कांबळे, सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे, नियोजन समिती सदस्य तथा भाजप माढा पश्चिम मंडल अध्यक्ष योगेश बोबडे आणि डॉ. शशिकांत तरंगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य प्रतिभा खरात, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे यांचे प्रतिनिधी नागनाथ वाघे, पंचायत समिती उपसभापती प्रतिनिधी हनुमंत गिड्डे, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी परमेश्वर खरात, दिलीप भोसले, मधुकर देशमुख, माणिक श्रीरामे, सचिन देशमुख, दादासाहेब देशमुख, अशोक मिस्किन, तानाजी गाडे, नागेश खटके, जितेंद्र गायकवाड, निवृत्ती तांबवे, संभाजी पाटील, पत्रकार सचिन होदाडे, सतीश काळे तसेच गावचे विद्यमान व माजी सरपंच, पदाधिकारी आणि शेकडो समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक किशोर सलगर यांच्यासह रामचंद्र आबा टकले, राजाभाऊ थोरात, तानाजी सलगर, कांतीलाल टेळे, अण्णासाहेब ठेंगल, धनाजी जवळगे, बळीराम टकले, केशव देवकते, लक्ष्मण पाटील, माणिक झिंजे, तात्यासाहेब कारंडे व अमोल देवकते यांनी विशेष सहकार्य केले.
Post Views: 46