
टेंभुर्णी – (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत, शिवसेना उपनेते शेवाळे, माढा लोकसभा संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील, खासदार ज्योती वाघमारे, माढा तालुका शिवसेना नेते संजय कोकाटे, माजी आमदार शहाजीबापू पाटील तसेच माढा व करमाळा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उदय माने यांनी भारतीय जनता पक्षातून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रवेशानंतर बोलताना त्यांनी सांगितले की, “माढा तालुक्यात गाव तिथे शिवसेनेची शाखा उभारण्याचा संकल्प आहे. पक्षवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक बळकट करण्याचा निर्धार केला.महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व युवासेना प्रमुख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुक्याचे नेते संजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक काम अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्धार व्यक्त केला.माढा तालुक्यात बूथप्रमुख, गटप्रमुख व बीएलए नियुक्तीचे काम पूर्ण करून पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही माने यांनी सांगितले.
Post Views: 9