
पंढरपर – येथील तालुकापोलिसांनी डिझेल चोरी प्रकरणी कारवाई करीत सुमारे ८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमालजप्त केला आहे. या प्रकरणी एका ताब्यात घेतले असून त्याच्या इतर दोन साथीदारांचा पोलिसांकडूनशोध घेतला जात असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावरयांनी दिली.
या कारवाई संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील तुंगत येथे २६ मे २०२६ रोजी रात्री विशाल भोसले यांचे दहा चाकी ट्रक मधून एक जण ब्रीजा गाडीमध्येडिझेलचे ड्रम ठेवून दुसरे दोन जण फायबरच्या पाईपच्या साह्याने ट्रक मधून डिझेल चोरीकरीत होते. या वेळी त्यांनी तीन ड्रम डिझेल चोरी केली. त्यानंतर ट्रकचा मालक विशाल भोसले यास संशयआल्यानंतर त्यांनी ब्रिझा गाडीचा पाठलाग केला.
दरम्यान ब्रिझा गाडी गुरसाळे बायपासला आल्यानंतर त्या ठिकाणी समाधान गुटाळ याचे हॉटेल समोर असलेल्या एका गाडीच्या बाजूला ब्रिझागाडी लावून त्या ठिकाणी देखील ब्रिजा गाडीमधून दोघेजण खाली उतरून आणि एक जण प्लास्टिकची पाईप तेथील ट्रकच्या गाडीला लावून डिझेलचे टाकीतून डिझेल चोरी करीत असताना परिसरातील लोकांनी आरडाओरडा केल्याने तिथून दोघे पळून गेले. यावेळी एकाव्यक्तीला लोकांनी पाठलाग करून पंढरपूर तालुका पोलिसांना याची माहिती दिली.
त्या नंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी घटनेच्या ठिकाणी जाऊन चोरी केलेले डिझेल ब्रिजाकार व तीन मोबाईल फोन असा एकूण तीन ड्रम डिझेल सह आठ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.यावेळी दत्तात्रय महारुद्र लोहार (रा. मोहोळ,ता. मोहोळ) याला ताब्यात घेतले असून त्याचे विरुद्ध आणि त्याचे इतर दोनसाथीदारां विरुद्ध डिझेलचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शना खाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे व शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे, भारत भोसले, दत्तात्रय तोंडले, एएसआय विजू गायकवाड, पोलीस हवालदार जाडकर, नितीन चौरे, सुजित उबाळे, पोलीस हवालदार साळुंखे, संजय गुटाळ, मंगेश रोकडे, पोलीस हवालदार योगीराज खिलारे, सुहास देशमुख, दीपक भोसले, अभिमन्यू गरड यांच्या पथकाने केली आहे.
——————–
चौकट : (डिझेल चोरीचे आणखीन गुन्हे उघड होण्याची शक्यता )
मागील दोन महिन्यात तुंगत
गुरसाळेरोडवर डिझेल चोरीच्या अनेक घटना घडलेल्या होत्या त्या बाबतीमध्ये सदर कारवाईतूनआणखीन डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे.
Post Views: 6