मोडनिंब – (ता.माढा) येथे भाजप युवा मोर्चा माढा तालुक्याच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा भाजप नेते रणजीत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, भाजप नेते वैभव मोरे यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी सन्मान करण्यात आला. नूतन शहर मंडल निवडीकरिता अनिकेत गुरव व अमोल सरडे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पवन गिड्डे यांना नवीन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी भाजप तालुका महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना सावंत, भाजप शहराध्यक्षा मनिषा गिड्डे तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नूतन पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.