सोलापूर – मागील भांडणाचा राग मनात धरून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना शुनिवारी पहाटे निंबर्गी येथे घडली. खून झालेल्या भावाचे नाव रेवणसिध्द ऐवळे असून संतोष ऐवळे खून केलेल्या भावाचे नाव आहे. मंद्रूप पोलीसात या घटनेची नोंद झाली आहे.
शनिवारी ३० मे रोजी पहाटे रेवणसिध्द ऊर्फ महांतेश सुर्यकांत ऐवळे वय ४० वर्षे यांना संतोष सुर्यकांत ऐवळे यांनी रात्री त्यांचे आईस रेवणसिध्द याने भाजी चांगली बनविली नाही. म्हणुन आईचे अंगावर भाजी टाकल्याचे कारणावरून फिर्यादीचे पती व दिर यांचेत भांडण झाले होते. त्या कारणावरून संतोष ऐवळे याने त्याचा राग मनात धरून रेवणसिध्द यांना घरासमोर झोपले असताना जात्याची दगडी व गोल पाळी , पतीचे कपाळावर व तोंडावर मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले . संतोष व रेवणसिध्द दोघेही भाऊ आहेत. लहान भाऊ संतोष यांनी मोठा भाऊ रेवणसिध्द याचा खून केला आहे.
दिपाली रेवणसिद्ध उर्फ महांतेश ऐवळे, वय 23, राहणार निंबर्गी यांनी
संतोष ऐवळे रा निंबर्गी याचेविरूध्द फिर्याद दिली आहे. आरोपी संतोष फरार असून पोलीस निरीक्षक शंकर पटवारी तपास करीत आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















