सांगोला – विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजच्या प्राचार्यपदी चारूदत्त दिगंबर जगताप यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली. सुरवातीला गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांचे हस्ते प्राचार्य पदाचे नियुक्तीपत्र देऊन चारूदत्त जगताप यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्था सदस्य दिगंबर जगताप, माजी प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक उत्तम सरगर, काकासो नरूटे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्राचार्य चारूदत्त जगताप यांनी सांगोला विद्यामंदिर प्रशालेत ११ आणि नाझरा विद्यामंदिर येथे १६ वर्षे सहशिक्षक म्हणून कार्य केले. त्यानंतर कोळा विद्यामंदिर येथे २ वर्षे पर्यवेक्षक म्हणून आणि सांगोला विद्यामंदिर येथे उपमुख्याध्यापक म्हणून त्यांनी आपल्या गतिमान प्रशासनाची चुणूक दाखवली. त्यांच्या नियुक्ती बद्दल संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड.विजयसिंह चव्हाण, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्या शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
चौकट-
संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय प्रशासनात आधुनिकता आणतानाच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि कौशल्यात्मक विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. मैदानावर अखंड परिश्रम करण्याची वृत्ती आणि सांघिक नेतृत्वगुण आता प्रशासकीय कार्यात प्रभावीपणे राबवून सांगोला विद्यामंदिरच्या चौफेर प्रगतीसाठी व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मी संपूर्ण क्षमतेने प्रयत्नशील राहीन.
-चारूदत्त जगताप, नूतन प्राचार्य