सांगोला – सांगोला महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख डॉ.बबन गायकवाड, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ.तानाजी माने व वरिष्ठ लिपीक प्रकाश पैलवान यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे थोर साहित्यिक प्रा.डॉ.राजेंद्र दास, कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, सहसचिव साहेबराव ढेकळे, सदस्य विश्वनाथ चव्हाण, म.सि.झिरपे, रावसाहेब ताठे, शामराव लांडगे, सुरेश फुले, चंद्रशेखर अंकलगी, प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले उपस्थित होते. याप्रसंगी संपादक डॉ.दत्ता सरगर लिखित साधेपणातील मोठेपण-प्रा.डॉ.बबन गायकवाड सेवापूर्ती गौरव अंक व दुष्काळातून वाटचाल एका स्वप्नाची-डॉ.तानाजी माने आत्मकथन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
मनोगतात डॉ.राजेंद्र दास यांनी विद्या ही विनयतेने शोभते, डॉ.बबन गायकवाड, डॉ.तानाजी माने यांनी जीवनभर विनयता जपली. तर प्रकाश पैलवान यांनी विद्यार्थ्यांना चांगली सेवा दिली असे सांगितले. बाबुराव गायकवाड यांनी तिघांनी सेवेतील प्रामाणिकपणे केलेल्या कामाबद्दल कौतुक केले व त्यांचे उर्वरीत आयुष्य आनंददायी व उत्तम आरोग्यमय जावो अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ.रामचंद्र पवार, प्र.अधिक्षक विलास माने, डॉ.बबन गायकवाड, डॉ.तानाजी माने व प्रकाश पैलवान यांनी मनोगते व्यक्त केली. सत्कारमूर्तींनी आपल्या सेवाकालावधीतील अनुभव व्यक्त करत संस्थेमध्ये सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल संस्थेचे व महाविद्यालयाचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुरेश भोसले, सूत्रसंचालन प्रा.संतोष कांबळे यांनी केले. आभार डॉ.रमेश बुगड यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, सत्कारमूर्तींचे नातेवाईक व हितचिंतक उपस्थित होते.
Post Views: 26