
सोलापूर – येथील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या ‘विजय ट्रॉफी २०२६’ सुपर नॉकआउट क्रिकेट स्पर्धेत सुधान्वू मनूरच्या अष्टपैलू खेळामुळे मॉडेल क्रिकेट अकॅडमी ‘अ’ संघाने नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा २४३ धावांनी पराभव करत एकतर्फी विजय मिळवला.
मॉडेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चौफेर फटकेबाजी करत ३८.३ षटकांत सर्वबाद ३६७ धावांचा विशाल डोंगर उभा केला. सलामीवीर मारुती कांबळे याने अवघ्या ५० चेंडूंत १५ चौकार व १ षटकारासह ८५ धावांची वादळी खेळी केली. त्याला सुदेश राठोड (३१ चेंडूंत ६३ धावा) आणि सुधान्वू मनुर (३५ चेंडूंत ५३ धावा) यांनी अर्धशतकी योगदान देत मोलाची साथ दिली.
३६८ धावांच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा डाव मॉडेलच्या अचूक माऱ्यापुढे पत्त्यांसारखा कोसळला. नॅशनल अकॅडमीचा पूर्ण डाव ३२.३ षटकांत अवघ्या १२४ धावांवर आटोपला. मॉडेल अकॅडमीचा कर्णधार अक्षय हावळे याने घातक गोलंदाजीचे प्रदर्शन करत २.३ षटकांत अवघ्या ४ धावा देऊन ३ बळी घेतले. त्याला यश बोरामणी आणि सुधान्वू मनुर यांनी प्रत्येकी २ बळी घेत उत्तम साथ दिली.
पंच म्हणून अशोक डोंबाळे, शुभम मुत्तूर तर
गुणलेखक म्हणून अनिल सलगर यांनी काम पाहिले.






















