
सांगोला – कै.वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी विठ्ठलपंत शिंदे यांची सेवा जेष्ठतेनुसार नियुक्ती करण्यात आली. सुरुवातीस संस्थापक वामनराव शिंदे व सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन हरिराम बाबर, उद्धव पाटील, संस्थाध्यक्षा कौशल्यादेवी शिंदे व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्यादेवी शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलपंत शिंदे यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महेश सुर्वे, दिग्विजय चव्हाण, रामभाऊ शिंदे, ॲड.बबनराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलकंठ शिंदे, सूत्रसंचालन भालके यांनी केले. आभार अर्चना गोडसे यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 8