
करमाळा – राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती निमित्त त्यागमूर्ती माता रमाई बुद्ध विहार सिद्धार्थ नगर येथे दि.31/5/2026 रोजी सायं 7 वा. मृत्युंजय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था करमाळा व भिमगर्जना लेझिम संघ संस्थापक अध्यक्ष शिलराज दशरथ ( आण्णा ) कांबळे व सदस्य अरविंद अरुण समिंदर, अभिजीत अशोक सदाफुले, किरण तुकाराम मोरे, अजय आप्पासाहेब कांबळे, बापूसाहेब कैलास कांबळे, गौरव राजेंद्र चव्हाण, अमित ज्ञानदेव भोसले यांच्या व भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मृत्युंजय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था करमाळा व भिमगर्जना लेझिम संघ सदस्य अरविंद अरुण समिंदर, अभिजीत अशोक सदाफुले, अमित ज्ञानदेव भोसले यांच्या हस्ते व दिलीप तुकाराम कांबळे चाचा यांच्या परिवाराच्या वतीने भीमराव (फकीरा) कांबळे च्या हस्ते जिलेबीचे वाटप करण्यात आले.
केंद्रीय शिक्षिका शोभाताई कांबळे व केंद्रीय शिक्षिका पुष्पाताई भीमराव कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
बुद्ध विहरामध्ये जेष्ठ पोर्णिमेचे महत्व सुजाता ताई रमेश धेंडे मॅडम यांनी संगीतले त्याबद्दल त्यांचे शालन बाई कांबळे यांनी फूलगुछ देवून त्यांचा सम्मान केला.
शांताबाई महादेव कांबळे यांच्या परिवाराच्या वतीने कालकथित महादेव विश्वनाथ कांबळे यांच्या स्मरणार्थ हापूस आंब्याचे वाटप करण्यात आले.
शेवटी शरनतय गाथा घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
Post Views: 6