रेल्वे बोर्ड कमिटीचे सदस्य राजेंद्र फडके यांच्यासह मुंबईचे कैलास वर्मा आणि चेन्नईचे रविचंद्रन या सदस्यांनी सोलापूर रेल्वे स्टेशनची पाहणी करत रेल्वेकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेची माहिती घेतली यावेळी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याबद्दल तसेच प्रसाधनगृहामध्ये अस्वच्छता आढळून आल्याने संबंधित ठेकेदारांवर आणि हॉटेल चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देखील बेजबाबदार वागण्याबद्दल जोरदार फैरावर घेतले.
फडके आणि वर्मा हॉटेलमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाची पाहणी केली तसेच स्वयंपाक गृहामध्ये जाऊन प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची स्वतः तसेच हॉटेल मालक आणि मॅनेजर यांना देखील चव चाखायला लावली यावेळी बटाट्याची भाजी खराब आढळून आली. त्यानंतर निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याबद्दल हॉटेल चालक मालक आणि मॅनेजर यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच प्रसाधनगृहामध्ये अस्वच्छता आढळून आल्याने आणि दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांमध्ये कमतरता आसल्याने संबंधित ठेकेदारावर कारवाई करत स्टेशन मास्टर यांना देखील याबाबत जाब विचारला.
दरम्यान रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या नागरकोईल एक्सप्रेस आणि सोलापूर पुणे पॅसेंजरमध्ये जाऊन देखील रेल्वेची पहाणी केली आणि प्रवाशांना रेल्वेच्या कामकाजाबाबत माहिती विचारली याप्रसंगी काही प्रवाशांनी समाधान व्यक्त केले तर काहींनी रेल्वेमध्ये दिल्या जाणाऱ्या विविध सेवांबद्दल तक्रारी केल्या. यावेळी रेल्वे बोर्डच्या सदस्यांनी रेल्वे स्टेशनसह, स्त्री-पुरुष प्रसाधनगृह, प्लॅटफॉर्म, एक्सलेटर मशीन, लिफ्ट, ब्रिज, पॅसेंजर ट्रेन आदीची पाहणी केली.
यावेळी ज्या ज्या ठिकाणी त्रुटी आणि निष्कृष्टता आढळली त्या त्या ठिकाणी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची जोरदार कान उघडणी करत अधिकाऱ्यांसह मक्तेदारांना देखील फैलावर घेतल्याचे दिसून आले पहा रेल्वे बोर्ड सदस्यांची स्टेशनं पाहणी…………. दरम्यान पाहणी दौरा संपन्न झाल्यानंतर रेल्वे बोर्डचे सदस्य डॉ राजेंद्र फडके यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना रेल्वे स्टेशनची पाहणी दौऱ्यानिमित्त माहिती दिली तसेच प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या सेवेबद्दल तसेच जेवणाबद्दल संबंधित मक्तेदारांवर करावी करण्याचे आदेश दिले तर रेल्वे अधिकाऱ्यांवर देखील बेजबाबदार वागणुकीबद्दल समज दिल्याचे सांगितले.
याप्रसंगी रेल्वे बोर्डाचे इतर सदस्य मुंबईचे कैलास वर्मा , चेन्नईचे रविचंद्रन, अप्पर रेल्वे प्रबंधक परिहार, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक रणयेवले आदींसह रेल्वेच्या विविध विभागाचे अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे पोलीस फोर्सचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते