पंढरपूर – श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी पंढरपूर येथे दि ५ जुन २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये विविध झाडांचे वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षणासाठी संबोधित करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. पाटील यांनी उपस्थितांना पर्यावरणाचे महत्व विषद करून पर्यावरण बचावासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान आवश्यक आहे असे सांगून वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले. तसेच प्रत्येकानी घरामद्धे एक तरी झाड लावावे व त्याचे संगोपन करावे व ते इतरांना हस्तांतरित करून वृक्ष लागवडीची ही चळवळ वाढवावी असे आवाहन केले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी सर्वाना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देऊन वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनासाठी प्रेरित केले. सदरच्या कार्यक्रमाला कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए. बी. कणसे, रजीस्ट्रार श्री. जी. डी. वाळके, उप प्राचार्य प्रा. जे. एल. मुडेगावकर, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मोरे, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, तसेच विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एम. लंबे, डॉ. एस. व्ही. एकलारकर, डॉ.अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले तसेच कर्मयोगी शिक्षण समूहातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. गणेश बागल यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
–महेश भंडारकवठेकर ०६-०६-२०२६–
Post Views: 9