सोलापूर – गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला सलमान गुलाब सय्यद (वय-२९ वर्षे, रा. जुना बोरामणी नाका, रविवार पेठ, सोलापूर ) यास सोलापूर शहर व उर्वरित सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे .
सलमान सय्यद या विरुध्द सन २०१८, २०२०, २०२५ व २०२६ या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा करणे, सरकारी नोकरांचे कामात अडथळा निर्माण करणे, सामान्य नागरीकांना मारहाण करुन दहशत निर्माण करणे यासारखे गुन्हे दाखल आहेत .त्यामुळे जेलरोड पोलीस ठाणेकडून त्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) प्रीतम यावलकर यांना सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्तावाचे अनुषंगाने उपायुक्त प्रितम यावलकर यांनी कार्यवाही करुन सलमान सय्यद यास सोलापूर शहर व उर्वरीत सोलापूर जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केलेबाबत ५ जून रोजी आदेश पारित केले आहेत.
Post Views: 4