सोलापूर : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आज शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महापौर कोंड्याल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा आदर्श समाजाने अंगीकारण्याची गरज व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत समाजहिताचे कार्य करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच नागरिकांनी शिवरायांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि दूरदर्शी विचारांवर चालत समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही महापौरांनी केले.
या कार्यक्रमास नगरसेवक विनोद भोसले, माजी उपमहापौर पद्माकर काळे, राजन जाधव, जयवंत सलगर, अंबादास शेळके, बजरंग जाधव, प्रकाश ननवरे, सदाशिव पवार, नागेश खरात, विजय पुकाळे, किरण भंडारी, देविदास घुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
Post Views: 15