
सोलापूर – ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून युवराज मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व कॅन्सर रिसर्च सेंटर, ड्रीम फाउंडेशन, लेवा पाटीदार बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, बसव संगम शेतकरी गट व विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘कॅन्सरमुक्त भारत कॅन्सरमुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत “पर्यावरण जागर सन्मान – २०२६” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पर्यावरण जागर क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन ५ जून जागतिक पर्यावरण दिन निमित्त पर्यावरण जागर सन्मान २०२६ ने पर्यावरणप्रेमींचा सन्मान करण्यात आला. यात नंदकुमार टिंगरे, नागेश म्हेत्रे, अजित चव्हाण, शिरीष गोळवलकर, स्मिता देशपांडे, जितेंद्र वाघमारे आणि अनु क्षीरसागर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. संतोष राठोड, सुनील वाघमारे, प्रवीण तळे, बाळासाहेब पाटील व काशिनाथ भतगुणकी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नगरसेवक राजशेखर पाटील, संगीता जाधव, शिवाजी वाघमोडे, वनिता पाटील, पोलिस निरीक्षक दिलीप ताडकासे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन युसूफ पीरजादे यांनी केले तर आभार दत्तात्रय पाठक यांनी मानले.























