जेऊर – उंदरगाव (ता.करमाळा}) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत मूल्यमापनासाठी आलेल्या टीमचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत गावात राबवत असलेले विविध उपक्रम पाहून अधिकारी झाले प्रभावीत
करमाळा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात असून याची पाहणी करण्यासाठी जिल्हास्तरीय मूल्यमापन समिती यांनी भेट देऊन मूल्यमापन केले यावेळी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान साहेब(भा प्र से) पाटोदा पंचायत समिती गटविकास अधिकारी उद्धव सानप पंचायत समिती पाटोदाचे आधीकारी बापूराव राख , उद्धव नेटके ,आकाश बनसोडे आर्शद शेख, बांधकाम विभागाचे संतोष खाटने या अधिकाऱ्यांच्या टीमने गावाला भेट देऊन गावात राबवत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली.
उंदरगाव ग्रामस्थांच्या वतीने बैलगाडी मधून भव्य मिरवणूक काढून टीमचे जंगी स्वागत केले.यावेळी गावातील प्रत्येक घरावर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाची गुढी ग्रामस्थांनी उभारली होती. ग्रामपंचायतच्या वतीने शासनाच्या विविध योजनांची गावामध्ये केलेली प्रभावी अंमलबजावणी प्रत्येक घराच्या परिसरात तयार केलेली सेंद्रिय परसबाग , गावातील अभ्यासिका आधुनिक व्यायाम शाळा , बचत गटाच्या माध्यमातून होत असलेले काम ग्रामपंचायतीने निर्माण केलेल्या विविध सुविधा तसेच सेंद्रिय शेती,गावात मोठ्या प्रमाणात शेतकरी पिकवत असलेली वेलची केळी शेती, याची पाहणी आलेल्या टीमने केली संपूर्ण गावाची एकी पाहून सर्व अधिकारीवर्ग प्रभावित झाला. यावेळी करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सहाय्य गट विकास अधिकारी सर्वाधिकारी वर्ग सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
Post Views: 11