
सोलापूर – येथील मार्कंडेय जलतरण तलाव येथे झालेल्या राज्य डायव्हिंग स्पर्धेत कनक शंकू हिने २ सुवर्ण व १ रौप्य अशी ३ पदकांची कमाई केली आहे. ज्ञान प्रबोधिनी मध्ये शिकणाऱ्या कनक हिने १४ वर्षाखालील गटात हायबोर्डमध्ये रौप्य तर एक व तीन मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग मध्ये सुवर्णपदक पटकावले. तिला मनीष भावसार यांचे मार्गदर्शन लाभले.




















