पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील वीरशैव लिंगायत समाज संघटनेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रम राबवून पिलीव येथील खंडोबा मंदिरात अत्यंत धार्मिक भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली .
प्रारंभी श्री ष..ब्र 108 प्रभूदेव. शिवाचार्य माढेकर महाराज यांचे आशीर्वचन झाल्यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन श्री ष.ब्र.108 प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराज व आमदार विजयकुमार (मालक)देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी श्री ष.ब्र. 108 प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराज आमदार विजयकुमार देशमुख (मालक) प्रमुख वक्ते सुहास उरवणे संकेत देशमुख, शिवम घोंगडे, संतोष देशमुख ,ओंकार देशमुख, श्रीकांत आर्वे ,शिवम राजमाने, सोहन धसाडे ,सुजित खलीपे व समस्त वीरशैव लिंगायत समाजातील जेष्ठ नागरिक महिला पुरुष युवक युवती उपस्थित होत्या .
यावेळी प्रारंभी प्रास्ताविकात अध्यक्ष संकेत देशमुख यांनी वीरशैव लिंगायत समाज संघटनेच्या वतीने व जयंती उत्सव समितीच्या वतीने राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती देऊन आलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी समस्त वीरशैव लिंगायत समाजातील महिला ,पुरुष यांनी लिंगायत धर्मांतील असलेले संस्कार रितीरिवाज व धर्माचे,व धर्माच्या शिकवणीचे आदर्शाचे पालन करून लिंगायत धर्माप्रमाणे दैनंदिन जीवनात आचरण करण्याची विनंती तथा आवाहन त्यांनी केले. तर यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमदार विजयकुमार देशमुख( मालक )यांनी महात्मा बसवेश्वराच्या समानतेचा व समतेचा आदर्श आचरणात आणून त्यांनी दिलेल्या वचनामृताचा व वचनाचे पालन करून अभ्यास करावा महात्मा बसवेश्वर यांनी त्या 12 शतकाच्या काळात काळात अत्यंत मनापासून स्वतःपासून जातिभेद नष्ट करून सर्वांना ,बहुजन समाजाला समानतेचा संदेश देऊन स्वतःही त्या पद्धतीने आचरण केल्याची माहिती आमदार देशमुख यांनी यावेळी दिली त्यांनी सर्व लिंगायत समाजाच्या साठी लिंगायत धर्माची स्थापना केली व लिंगायत धर्माच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला जातीभेदापासून दूर राहून सर्व मानव जात समान असल्याचा पुनर्रचार केला दरवर्षी पिलीव भागातील वीरशैव लिंगायत समाजाचे कार्यकर्ते महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी करीत असल्याने समाधान व्यक्त करून समाजातील तरुणांना धन्यवाद दिले .
यावेळी प्रमुख वक्ते सुहास उरवणे यांनी महात्मा बसवेश्वराच्या जीवन चरित्रावरील अभ्यासपूर्ण मांडणी व त्यांनी दिलेल्या शिकवणीचे वचनांचे केलेल्या धर्माच्या स्थापनेविषयी सविस्तर माहिती वेगवेगळ्या प्रकारची घडलेल्या प्रसंगाची उदाहरणे देऊन लोकांच्या ज्ञानात भर घातली .
यावेळी प्रास्ताविक अध्यक्ष संकेत देशमुख तर आभार प्रदर्शन शिवम घोंगडे यांनी व्यक्त केले.
फोटो
महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करताना श्री 108 प्रभूदेव शिवाचार्य माढेकर महाराज आमदार विजयकुमार देशमुख मालक, नानासाहेब देशमुख नामदेवराव देशमुख श्री व सौ संकेत देशमुख सुहास उरवणे संकेत देशमुख ओंकार देशमुख श्रीकांत आर्वे शिवम, राजमाने, सोहन धसाडे सुजित, खलीपे आदी मान्यवर.
Post Views: 14