सोलापूर – शेतात सर्पदंश झालेल्या औज आहेरवाडी येथील एका 14 वर्षीय शाळकरी मुलीचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज मंगळवारी पहाटे एक वाजता मृत्यू झाला .
श्रावणी अभय पाटील (वय 14 वर्ष, रा.औज आहेरवाडी, दक्षिण सोलापूर) असे त्या मयत मुलीचे नाव आहे.
कु श्रावणी ही 7 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास औज आहेरवाडी येथील शेता तून म्हशीला घेऊन जात असताना डाव्या पायास साप चावला होता. त्या मुळे ती चक्कर येऊन पडली . त्यामुळे तिला काका रामदास सलगर यांनी तात्काळ एका खाजगी दवाखान्यात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात दुपारी दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान आज मंगळवारी पहाटे मृत्यू झाला.
चौकट – कुमारी श्रावणी नुकतीच इयत्ता नवीची परीक्षा पास झाली होती आणि चालू शैक्षणिक वर्षात दहावीला प्रवेश करणार होती. तिच्या पश्चात आई-वडील आणि दोन लहान भाऊ असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .
Post Views: 36